फुलोराच्या दैनंदिन कामाची रचना –

नियमित येणारे शिक्षक – ४       मार्गदर्शक शिक्षक – ४        वाचनालय प्रमुख – १          मदतनीस – १

आमचे शिक्षक

supriya urunkar

सुप्रिया उरुणकर

बालवाडी प्रशिक्षित

सुप्रियाताईंचा कोणतंही काम नीटनेटकं व शिस्तबद्ध करण्याकडे कल असतो.
Nandani

नंदिनी पाटील

बालवाडी प्रशिक्षित

नंदिनीताई इंग्रजी अध्यापनात नवनवे प्रयोग करतात. शिकवण्यात जुन्या – नव्याचा चांगला मेळ घालतात.
shamali

शामली यादव

बालवाडी प्रशिक्षित

शामलीताई वेगवेगळ्या कामांची जबाबदारी मनापासून घेतात. कायम उत्साही असतात.
sanika

सानिका तासे

बालवाडी प्रशिक्षित

सानिकाताई मुलांमध्ये छान रमतात. गाणी, गोष्टी, खेळ घेण्याची आवड आहे.

मानद शिक्षक व मार्गदर्शक

Nirmala tai

निर्मला पोतनीस

B.Com
संगीत विशारद

निमाताई भाषेच्या अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करतात.गाणी, नाटुकली यांची विपुल निर्मिती, पालक-शिक्षकांसाठी नाट्यलेखन करतात.ओरिगामीचा छंद जोपासला आहे.
suchita

सुचिता पडळकर

M.A. राज्यशास्त्र

मुलांच्या शिक्षणाबद्दल यांना अत्यंत कळवळा अहे. ‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञानात रस निर्माण होईल असे प्रयोग मुलांसाठी करतात. बौद्धिक खेळ घेण्याची आवड.
Kishori

किशोरी सबनीस

B.Com

किशोरीताई फुलोराच्या ‘perfectionist’ म्हणून ओळखल्या जतात. कोणतंही काम सुबक, नीटनेटकं, अत्यंत सौंदर्यपूर्ण असते. हस्तकलेतल्या अनेक प्रकारात निपुण आहेत.चित्रकला, भरतकामातून निर्मितीचा छंद जपला आहे.
no image1

शिल्पा कुलकर्णी

B.Com

शिल्पाताई मराठी भाषेचे अध्यापन करतात. कलात्मक कामं विशेष चांगली करतात.बालवाडी प्रशिक्षित, स्पेशल एज्युकेटर म्हणून या काम करतात.

वाचनालय प्रमुख

no image1

गौरी प्रसादे

वाचनालय प्रमुख

गौरीताई पालक म्हणून फुलोरा कुटुंबात आल्या आणि पुढं शिक्षक झाल्या. वाचनाची आवड आहे. वचानालायचं काम गेली अनेक वर्ष सांभाळत आहेत. यांना गाण्याचा छंद आहे.

मदतनीस

sonal

सोनल कलकुटकी

मदतनीस

सोनलताई वक्तशीर आहेत. मुलांशी प्रेमानं वागतात आणि जबाबदारीनं काम करतात.