सर्कसवाला

शिशुगटाने ‘सर्कसवाला आला हो’ हे अभिनयगीत पेश केले. सर्कसची धमाल सुटली.

दूधप्रकल्प

बालगटासाठी १५ दिवस ‘दूध प्रकल्प’ घेतला गेला.

दुधगाव ते तुपगाव प्रवास छोट्या नाटुकल्यातून सादर केला. रेल्वे ने फुलोरा स्टेशन सोडले आणि दुधारी, सायगाव, दहिगाव, ताकारी, लोणागाव, तुपवाडी, असा प्रवास केला. ‘झुकूझुकू झुकूझुकू अगीनगाडी’ या प्रसिद्ध गाण्याचा चालीवर
झुकूझुकू झुकूझुकू दुधगाडी,
निघाली पहा तूपवाडी
हालत डुलत जाऊया
तुपवाडीला जाऊया…कु SS

सगळी स्टेशन्स टप्प्याटप्प्यात घेत गाडी तुपवाडीला जाऊन फुलोरात परतली.
या कार्यक्रमानंतर कोजागिरीच्या गोड़ दुधाचा आस्वाद सर्वानी घेतला. अद्वैताचा बाबानी दुधाची व्यवस्था केली होती. त्यांना धन्यवाद !

माकडे निघाली शिकारीला

माकडे निघाली शिकारीला हे गाणे खेळगटाने सादर केले. सर्व मुलांनी मुक्तपणे या गाण्याचा आनंद घेतला.