पालक म्हणतात…


दोन वर्षांपूर्वी फुलोरात आलेली सई आणि आताची सई यात खूप फरक आहे. समूहात न मिसळणे, काहीही शेअर न करणे या सवयींना मुरड घालायला शिकली .

फुलोरातली गाणी अप्रतिम. माझ्याही मनात रेंगाळतात. आम्ही दोघी बऱ्याचदा एकत्र गाणी म्हणतो.

फुलोराच्या वेगळेपणापैकी एक वेगळेपण आवर्जून नोंदवावेसे वाटते ते म्हणजे फुलोराची ‘नोंदवही’. अशा प्रकारचा उपक्रम इतर कुठल्याही शाळेत राबवला जात नाही. नोंदवहीची आवश्यकता व उपयुक्तता ती वाचल्यावरच कळते.

– सईची आई


 

पल्स पोलिओ डोस व वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम खूपच चांगला झाला. डॉक्टरांनी केलेल्या सूचना खूप मोलाच्या होत्या. पुढील तपासणीसाठीचे त्यांचे सहकार्य त्यांची आत्मीयता दाखवणारे होते. बरेच डॉक्टर फुलोराचे पालक आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद.

– अर्जुनचे बाबा


उंट, शेळी या प्राण्यांचे जवळून निरीक्षण, शेळीचे दूध पिण्याचा अनुभव, हरणे पहायला राजवाड्याची सहल, म्हशीचा गोठा पाहणे, मत्स्यालयाला भेट अशा सहली फुलोराने काढल्या. त्याच प्रमाणे एक मोठं सांडपाण्याच तळे बुजवून त्यावर कॅटरपीलर फिरवून त्याचे  सपाट मैदान करणे अशा अभ्यासपूर्ण सहली काढणे हे फुलोराचे वैशिष्ट्य… मोठ्यांनाही हेवा वाटेल अशा या सहली. 

– प्रथमेशची आई


फुलोराचे वेगळेपण म्हणजे काय हे शाळा सुरु झाल्यावरच समजून आले. कारण पाटी पेन्सील नाही, अभ्यास नाही, फक्त आई वडील, आजोबा, आज्जीचा सहभाग मुलांच्या शिकण्यात असावा असा आग्रह. एकूणच अजिंक्यबरोबर आईबाबांचीही शाळा सुरु झाली आहे, त्यामुळे आपण कुठे कमी पडतो हे समजते.
अजिंक्यची निरीक्षणशक्ती वाढली आहे, शब्दसंग्रहात भर पडते आहे. आम्हाला असं वाटतं की अजिंक्यला मातृभाषेतून शिकण्याचा आणि शाळेबद्दलचा आम्ही योग्य निर्णय घेतला आहे.

–  अजिंक्यचे आईबाबा